-->

Ads

धक्कादायक! माणसापेक्षा प्रतिष्ठा ठरली महत्त्वाची; तरुणाने गोळ्या झाडून केली बहिणीची हत्या

  
ऑनर किलिंगचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे 
(Honour Killing in Pakistan). यात एका 21 वर्षीय पाकिस्तानी महिलेची तिच्या भावाने गोळ्या झाडून हत्या केली (Man Killed Sister). ही महिला पंजाब प्रांतात नृत्य आणि मॉडेलिंग करत होती, त्यामुळे तिची हत्या करण्यात आली आहे. तरुणी प्रांतीय राजधानी लाहोरपासून 130 किमी अंतरावर असलेल्या रेनाला खुर्द ओकारा येथे स्थानिक कपड्यांच्या दुकानाच्या ब्रँडिंगसाठी मॉडेलिंग करत असे आणि तिच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन फैसलाबादमधील थिएटरमध्ये नृत्य करत असे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

मृत तरुणी सिद्राच्या पालकांनी तिला हे सगळं "कौटुंबिक परंपरेच्या विरोधात" असल्याचं सांगत हे काम बंद करण्यास सांगितलं. परंतु सिद्राने आपलं हे काम चालूच ठेवण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी सांगितलं की, सिद्रा गेल्या आठवड्यात फैसलाबादहून आपल्या कुटुंबासोबत ईद साजरी करण्यासाठी घरी आली होती.

गुरुवारी तिचे आई-वडील आणि भाऊ हमजा यांनी प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून तिच्याशी वाद घातला. यानंतरही तिने तिचा निर्णय न बदलल्याने तिला मारहाणही करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की नंतर दिवसा हमजाने सिद्रावर गोळीबार केला, त्यात ती जागीच ठार झाली. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची कबुली देणाऱ्या हमजाला अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलीस अधिकारी फराज हमीद यांनी सांगितलं की, सिद्राच्या एका नातेवाईकाने सिद्राच्या डान्सचा व्हिडिओ हमजाला पाठवला, तेव्हा हमजाला बहिणीचा राग आला. हमजाने पोलिसांना सांगितलं की, रागाच्या भरात त्याने आपल्या बहिणीला गोळ्या घालून ठार केलं. यावर्षी फेब्रुवारीमध्ये १९ वर्षीय डान्स आर्टिस्ट आयेशाची तिच्या माजी पतीने फैसलाबादमध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. पाकिस्तानमध्ये, विशेषतः उत्तर आणि पश्चिमेकडील आदिवासी भागांच्या जवळ असलेल्या भागात ऑनर किलिंगच्या घटना वारंवार घडत आहेत.

Post a Comment

0 Comments