नांदेड शहरात पुन्हा एकदा भर दिवसा झाला प्रसिद्ध व्यापाऱ्यांवर गोळीबार; एकच खळबळ .. बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची मृत्यूशी झुंज व चालक झाला जखमी
नांदेड| यवतमाळ प्रतिनिधी : संजय जाधव*
शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर शारदा नगर येथील स्वतःच्या घरापुढे गाडीतून बाहेर निघत असतानाच अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञाताने गोळीबार केला आहे. या घटनेत बियाणी यांच्या मेंदूवर गोळी लागली असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हि घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली असून, पुन्हा एकदा नांदेड शहरात भरदिवसा गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास बाहेरून आपल्या घरी परतले होते. गाडीतून खाली उतरत असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञातांनी बंदुकीतून ४ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात संजय बियाणीं यांच्या मेंदूला गोळी लागली असल्याचे सांगण्यात येत असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे चालकही यात जखमी झाले असून, घरासमोर रक्ताचा सडा पडल्याचे पाहावयास मिळते आहे. त्यांच्यावर नांदेडच्या ग्लोबल हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
0 Comments