-->

Ads

लग्न लावतो सांगून 200 मुलींना लावला चुना; शेवटी स्वत:लाच केलं मृत घोषित

 कोरोना काळात पठ्ठ्याने हा प्रताप केल्याचा खुलासा झाला आहे.



    लखनऊ, 5 एप्रिल : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) बस्ती पोलीस आणि सर्विलान्स टीमने एका गुन्हेगाराला अटक केली आहे. या नटवरलालवर देशातील अनेक राज्यांमधील 200 हून अधिक मुलींची लाखोंची फसवणूक (Money Fraud) केल्याचा आरोप आहे. बस्तीतील एका मुलीची या गुन्हेगाराने फसवणूक केली. यानंतर हा खुलासा झाला.

    मुलीने तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला. यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की, यात केवळ एकच मुलगी नाही तर अशा शेकडो मुलींना आरोपीने धोका दिला आहे. हा नटवरलाल मुलींच्या कुंडलीत दोष दूर करणे, चांगला मुलगा मिळावा असं सांगून मुलींकडून बँक अकाऊंटमध्ये पैसे मागवून पूजा-पाठ करण्याचं नाटक करीत होता. साध्या मुलींना तो आपल्या जाळ्यात अडकवत होता.

    गाजियाबाद येथे राहणारा तरुण कुमार कोरोना काळात इंटरनेटवर मेट्रिमोनियल अॅपच्या माध्यमातून प्लान बनवला. वेबसाइटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून लोकांकडून पैसे उकळवण्यास सुरुवात केली. तो मेट्रिमोनियल साइटवर मुलीची फसवणूक करीत होता. यानंतर कुंडली मिळवणं आणि ज्योतिषीकडून दूर करून घेण्याच्या नावाखाली अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगत होता.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हेगाराने आतापर्यत विविध राज्यांमधील 200 हून अधिक मुलींची मेट्रीमोनियल साइटच्या माध्यमातून फसवणूक केली आहे. लग्न ठरवणं आणि नातं जोडून देण्याच्या नावाखाली मुलींकडून हळूहळू पैसे काढत होता. जेव्हा मुली त्याच्यावर दबाव आणत तर तो स्वत:ला मृत घोषित करत होता. डीपीवर फूल चढवलेला फोटोदेखील ठेवत होता. मुलीदेखील यावर विश्वास ठेवत होत्या.

    Post a Comment

    0 Comments