-->

Ads

UP Election Result 2022: 'अब की बार पुन्हा योगी सरकार', सायकल पंक्चर; भाजप सुसाट

सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election Result 2022) निकालावर लागलं असताना राज्यात भाजपनं मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशाात भाजप 265 जागांनी आघाडीवर आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर आहेत. सपा विरुद्ध भाजप मोठ्या संख्येनं आघाडीवर आहे. शेवटच्या तासात हे अंतर थोडं कमी झालं आहे.

गोरखपूर सदर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सातत्याने आघाडीवर आहेत. येथे पाचव्या फेरीत योगी 22 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश राणा 1,700 मतांनी पिछाडीवर आहेत. स्वामी प्रसाद मौर्य 15,000 मतांनी पिछाडीवर आहेत. दारा सिंह चौहान ३ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. उत्तर प्रदेशातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय लालू 11,000 मतांनी पिछाडीवर असल्याचं समजतंय.

भाजपला गेल्या निवडणुकीत प्रथमच उत्तर प्रदेशात खणखणीत यश मिळालं. योगी आदित्यनाथ सरकार गेल्या वेळच्या 312 पैकी किती जागा टिकवणार याचे अंदाज वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनी वर्तवले आहेत. बहुतेकांनी भाजपच्या पदरात बहुमत टाकलं आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या युपीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सपशेल फेल ठरताना दिसल्या. प्रत्यक्ष निकालात ते किती खरं ठरणार हे कळेल. मायावतींचा बहुजन समाज पक्ष कुठपर्यंत मजल मारेल हेही स्पष्ट होईल.

403 पैकी 325 जागा मिळवून भाजपने मित्र पत्राबरोबर गेल्या निवडणुकीत एक मजबूत सरकार दिलं होतं. एकट्या भाजपनेच 312 जागा खिशात घातल्या होत्या. त्या वेळी उत्तर प्रदेशात मोदींची लाट होती, असं म्हटलं जातं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपने जाहीर केलेला नव्हता, तेव्हाचं हे घवघवीत यश आता पुन्हा मिळणार का हा प्रश्न आहे. योगी आदित्यनाथ सरकारला ते मागचं यश टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. योगी आदित्यनाथ भाजपला किमान बहुमताचा आकडा गाठून देऊ शकतात का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

दुसरीकडे समजवादी पक्षाने गेल्या निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly election 2017)47 जागा मिळवल्या होत्या. आता अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सायकल किती वेगाने आणि जोरात मुसंडी मारते हे पाहावे लागेल. खरी स्पर्धा ही भाजप आणि समाजवादी पक्षातच आहे. बाकी विरोधक तर भाजपपुढे सपशेल आपटले होते. यात सर्वाधिक हानी झाली होती काँग्रेसची. राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांचेही पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहेत. तसंच उत्तर प्रदेशचा भार प्रियांका गांधींवर सोपवण्यात आला होता. असं असूनही ऐतिहासिक दारुण पराभवाला काँग्रेसला सामोरं जावं लागतं होतं. काँग्रेसने गेल्या निवडणुकीत फक्त 7 जागा जिंकल्या होत्या. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने (BSP)जेमतेम 19 जागा जिंकल्या होत्या.

Post a Comment

0 Comments