पोलीस करत आहेत.
शोभा गुलाब पवार आणि प्रकाश भिकू निकम अशी आत्महत्या करणाऱ्या दोघांची नावं आहेत. याबाबत मृत महिलेच्या आईने आणि मृत पुरुषाच्या भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत शोभा यांचा काही वर्षांपूर्वी पाटण तालुक्यातील म्हारवंड येथील रहिवासी असणाऱ्या गुलाब पवार यांच्याशी विवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसांत त्यांच्या पतीचं निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर शोभा या कामासाठी मुंबईला गेल्या होत्या. तर त्यांचा मुलगा साताऱ्यात शिक्षण घेत होता.
याबाबत अधिक माहिती देताना मृत महिलेच्या आईनं सांगितलं की, 20 मार्च रोजी मुलगी शोभा ही मुंबईहून बामणेवाडी येथे आमच्या घरी आली होती. दोन दिवस घरी राहिल्यानंतर ती 22 मार्चला पाटण येथे कामानिमित्त जात असल्याचं सांगून म्हारवंड येथे गेली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही. त्यामुळे शोभा यांना शोधण्यासाठी तिचे नातेवाईक म्हारवंड येथे तिच्या सासरी गेले. यावेळी शोभा ही प्रकाश निकम यांच्या घरी गेली असून दोघं लग्न करणार असल्याची माहिती सासरच्यांनी शोभा यांच्या कुटुंबीयांना दिली.
त्यानुसार, शोभा यांचे नातेवाईक प्रकाश निकम यांच्या घरी पोहोचले. यावेळी घरी केवळ प्रकाश यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रकाश आणि शोभा यांच्याबद्दल विचारलं असता, दोघंही फोन लावण्यासाठी धावडमळी शिवाराकडे गेल्याची माहिती प्रकाशच्या पत्नीने दिली. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास सर्व नातेवाईक धावडमळीकडे गेले असता, शेतातील आंब्याच्या झाडाला दोघंही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

0 Comments