कोरोनाच्या दोन वर्षानंतर यावर्षी जिल्ह्यातील शंभर टक्के अनुदानित शाळांना दीड कोटी रुपयांचे वेतनेत्तर अनुदान वितरित केले जाणार आहे, त्यामुळे अश्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळा तसेच भौतिक सुविधा सुधारण्याला आता हातभार लागणार आहे.बुलडाणा जिल्ह्यातील शंभर टक्के अनुदानित असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील एप्रिल 2008 प्रमाणे शिक्षकांच्या वेतनाच्या पाच टक्के वेतनेत्तर अनुदान म्हणून निधी वाटप करण्यात येत आहे, जिल्ह्यात 317 माध्यमिक व 98 उच्च माध्यमिक असे एकूण 415 विद्यालय असून, या शाळेतील प्रयोगशाळा, सादिल, इमारत भाडे यासह शाळेच्या भौतिक सुविधा सुधारण्यासाठी या निधीचा वापर करता येऊ शकतो.मध्यंतरीचे अनेक वर्ष शासनाने वेतनेत्तर अनुदान थांबवले होते, मात्र आता या निधीची तरतूद करून, हे वेतनेत्तर अनुदान सुरू करण्यात आले आहे, कोरोनाच्या दोन वर्षानंतर यावर्षी बुलडाणा जिल्ह्यातील शाळांसाठी 1 कोटी 52 लाख 66 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे, त्याचे लवकरच शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना वितरण केले जाणार आहे.
प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
0 Comments