-->

Ads

कुत्र्याचा 5 वर्षांचा मुलावर खतरनाक हल्ला, 100 टाके घालायला लागला दीड तास

 

राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील  कालुखेडा गावात घराबाहेर खेळणाऱ्या एका मुलाला कुत्र्यानं चावा घेतला आहे. कुत्र्यानं त्या मुलाला असं ओरबडलं की, त्याच्या चेहऱ्याला 100 टाके घालावे लागले. अवघ्या 20 ते 25 सेकंदात कुत्र्यानं मुलाला एवढी मोठी जखमी केली की, त्याचे डोळे, नाक, ओठ याता टाके  घालण्यासाठी डॉक्टरांना दीड तास लागला. मुलाची अवस्था पाहून डॉक्टरही चक्रावले.

भिलवाडा जिल्ह्यातील कालुखेडा गावातील प्रल्हाद गुर्जर यांचा पाच वर्षांचा मुलगा गोपाल गुर्जर घराबाहेर मुलांसोबत खेळत होता. त्याचवेळी एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यानं मुलाला रस्त्यावर फेकलं आणि त्याचा चेहरा विद्रुप केला. जखमी मुलाचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय बाहेर आले. बाळाला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून कुटुंबीयही हादरले.घराबाहेर आलेल्या कुटुंबीयांनी कशी तरी कुत्र्या

पासून बाळाची सुटका केली आणि प्रथम त्याला मेजा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात, नंतर भिलवाडा येथील खाजगी रुग्णालयातील ईएनटी तज्ज्ञ डॉ राजेश जैन यांच्याकडे नेले. डॉ.राजेश जैन यांनी मुलाच्या चेहऱ्यावर दीड तास शस्त्रक्रिया केली, त्याला 100 टाके पडले. शस्त्रक्रिया करणारे डॉ.राजेश जैन म्हणाले की, त्यांनी आयुष्यात अशी घटना कधी पाहिली नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, मुलाची अवस्था पाहून धक्काच बसला. मुलाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.

डॉक्टर राजेश जैन यांनी सांगितलं की, मुलाच्या संपूर्ण चेहऱ्याची त्वचा कुत्र्याने खराब केली. त्यामुळे मुलाचा चेहरा खूपच विद्रुप झाला होता. मी शस्त्रक्रिया करून डोक्याची स्किन रोटेड केली आणि कपळावर घेतली. तर नाकाची त्वचा पूर्णपणे दुरुस्त केली. नाकाला मूळ आकारात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या मुलगा आयसीयूमध्ये आहे.

Post a Comment

0 Comments