-->

Ads

पुणे हादरलं, कोथरुडमध्ये पोत्यात आढळला 13 वर्षीय विशेष मुलाचा मृतदेह


 पुण्यात (Pune) गुन्हेगारीच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच कोथरूमध्ये (Kothrud) एका

13 वर्षीय विशेष मुलाचा (The body of a 13-year-old special child) निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात गुंडाळून एकलव्ह्य कॉलेज भागात असलेल्या शाळेच्या मैदानात फेकून देण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुडमधील एकलव्य पॉलिटेक्निक कॉलेज मैदानाजवळ एका १३ वर्षीच्या मुलाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आला. करण गोपाळ पराठोड (वय १३, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

एकलव्य कॉलेज मैदानाजवळ रात्रीच्या वेळेस लहान मुले खेळत होती. त्यांना पोत्यात काहीतरी बांधून ठेवलेले आढळून आले. मुलांनी पोत्यात काय आहे म्हणून उघडून पाहिल्यावर त्यांना त्यात मृतदेह आढळून आला. त्यांनी आसपासच्या लोकांना याची माहिती दिली. स्थानिकांनी पोत्यात मृतदेह असल्याचे पाहून एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली.

मृत मुलगा विशेष असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे आई वडील मजुरी करतात. मुलाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. यामुळे अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

Post a Comment

0 Comments