-->

Ads

2 वर्षांपासून बंद घरातून येत होती दुर्गंधी; दरवाजा तोडताच शेजाऱ्यांसह पोलीसही शॉक

एका इमारतीमध्ये राहणारे लोक मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या एका घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार करत होते. मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करत राहिले.



 पोलिसांच्या हलगर्जीपणाचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. मात्र लंडन पोलिसांनी (London Police) जे केलं ते जरा जास्तच अजब होतं. यासाठी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याचं कारण म्हणजे एका इमारतीमध्ये राहणारे लोक मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या एका घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार करत होते. मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करत राहिले. नुकतंच या घराचा दरवाजा तोडला गेला असता आतील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले (Dead Body Found in Home).

द सनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, दक्षिण लंडनच्या पेखम येथील एका इमारतीत राहणारे लोक मागील बऱ्याच काळापासून एका बंद घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रस्त होते. या घरात एक 61 वर्षीय महिला राहात होती. ऑक्टोबर 2019 मध्ये शेजाऱ्यांनी हाऊसिंग असोसिएशनला याबाबत माहिती दिली होती. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. पोलिसही तिथे आले मात्र असं म्हणून परत गेले की कदाचित कोरोना महामारीमुळे महिला लंडनमधून बाहेर गेली असावी.

बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा तक्रार केल्यानंतर अखेर मागील शुक्रवारी पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अधिकारी आतमध्ये गेले तेव्हा तेथील दृश्य पाहून हादरले. आतमध्ये एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. याचा पूर्णपणे सांगाडा बनलेला होता. शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं सांगितलं की जेव्हा सप्टेंबर 2019 मध्ये मी परदेशातून परतले तेव्हा मला वेगळीच दुर्गंधी आली. परिस्थिती अशी होती की आम्हाला नाक झाकून वावरावं लागत होतं. याची तक्रारही केली, मात्र काहीच झालं नाही.

सुरुवातीला शेजाऱ्यांना सांगण्यात आलं की गॅस लिक झाल्यामुळे दुर्गंधी येत असेल. मात्र बरेच दिवस दुर्गंधी कायम राहिल्याने लोक चिंतेत होते. मृत महिलेचा लेटरबॉक्स चिठ्ठ्यांनी गच्च भरला होता. तिच्या घराबाहेरील सायकलही तशीच उभा होती. शेजाऱ्यांना वाटलं की महिलेसोबत काहीतरी दुर्घटना घडली आहे, मात्र पोलीस हे मानायला तयार नव्हते. पोलिसांनी म्हटलं की कदाचित महिला लंडनमधून बाहेर गेली असेल. कोरोनामुळे अनेक लोकांनी शहर सोडलं होतं. मात्र आता घरात मृतदेह आढळून आल्यावर पोलिसांकडे काहीच उत्तर नव्हतं.

Post a Comment

0 Comments