-->

Ads

पत्नीसमोर प्रेयसीसोबत ठेवले शरीरसंबंध, नर्सच्या प्रेमात तरुणाचं धक्कादायक कृत्य; अखेर...

  एका महिला नर्सच्या प्रेमात तरुण वेडापीसा झाला आणि त्याने स्वत:च्या पत्नीला घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकच नाही तर पतीने तब्बल एक महिला नर्सला घरी ठेवलं. पत्नीसमोर दोघांनी शरीर संबंधही ठेवले. पत्नीने जेव्हा यास विरोध केला तर तिला मारहाण करू लागले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पतीने पत्नीला घराबाहेर हाकलून दिलं.

ही घटना खीवसर (Rajasthan News) पोलीस ठाणे हद्दीतील आहे. या सर्व प्रकारानंतर पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित महिलेने (32 वर्षे) सांगितलं की, 12 वर्षांपूर्वी धनारी निवासी भंवरराम डूडी (31 वर्षे) याच्यासोबत लग्न झालं होतं. त्यांना एक 10 वर्षे आणि दुसरा 3 वर्षांचा अशी दोन मुलं आहेत. गेल्या 5 वर्षांपासून दोघे बिकानेरमध्ये राहत आहेत. पीडितेने सांगितलं की, हरेंद्र बिकानेरमध्ये छोटेखानी क्लिनिक चालवतो. येथे संदीप कौर (26 वर्षे) नर्स म्हणून काम करते. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून अफेअर सुरू होतं. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकून घेत नव्हता. हरेंद्रने तीन दिवसांपूर्वी शुक्रवारी नर्स संदीप कौरसह मिळून पत्नीला घराबाहेर काढलं. यानंतर पत्नीने पोलिसांसमोर घडलेला प्रकार सांगितला.

पीडितेने सांगितलं की, एक महिन्यापूर्वी हरेंद्रने नर्सला घरी आणलं होतं. यानंतर ती इथच राहत होती. हरेंद्रने सांगितलं की, त्याने नर्ससोबत लग्न केलं आहे. यानंतर दोघे त्याच घरात राहू लागले. पीडितेने आरोप केला आहे की, दोघांनी अनेकदा तिच्यासमोर शरीरसंबंध ठेवले. महिलेने यास विरोध केल्यास तिलाच मारहाण करू लागले. शेवटी पीडितेने वडिलांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. पीडितेने सांगितलं की, या घटनेनंतर ती माहेरी निघून गेली. आता पती आणि नर्स तिच्यावर घटस्फोटासाठी दबाव निर्माण करीत आहेत.

Post a Comment

0 Comments