इंदूर : दोन दिवसांपूर्वी इंदूर (Indore) शहरातील लसुडिया परिसरात 'बँक ऑफ न्यूयॉर्क'च्या (Bank Of New York) महिला असिस्टंट वाइस प्रेसिडेंटने आत्महत्या (assistant vice president commit suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी बॉयफ्रेंडला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बॉयफ्रेंडला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
अक्षय भाटिया असं अटक केलेल्या 32 वर्षीय आरोपीचं नाव असून तो मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहे. तर शगून सचदेवा असं आत्महत्या करणाऱ्या 35 वर्षीय महिलेचं नाव आहे. ती मूळची दिल्लीतील रहिवासी असून 2019 पासून आरोपी अक्षयसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. मृत शगून ही बँक ऑफ न्यूयॉर्क'च्या पुणे शाखेत (Pune branch) असिस्टंट वाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत होती. तिला 1 मार्चपासून ऑफीस जॉइन करायंच होतं. त्यामुळे तिने आपल्या पुण्याला जाण्याचा हट्ट धरला होता.
पण आरोपी अक्षय आपल्या आई वडिलांना सोडून पुण्याला जाण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्याने गर्लफ्रेंडसोबत पुण्याला राहायला जाण्यास नकार दिला. याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर आरोपी अक्षय रागाच्या भरात घरातून निघून गेला. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास अक्षय पुन्हा घरी आला. बराच वेळ दरवाजा वाजवून देखील शगूननं दरवाजा उघडला नाही. त्यामुळे अक्षयने सुरक्षा गार्डच्या मदतीने दरवाजा तोडला. यावेळी शगून आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलीया घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी शगूनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, तो सध्यस्थितीत काहीही काम करत नसल्याचं समोर आलं आहे. पण गेल्या बऱ्याच काळापासून तो आपला व्यवसाय सेटल करण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती दिली आहे.
अक्षयचे वडील गुडगाव येथील एका बँकेत नोकरीला आहेत. येथेच आरोपी अक्षय आणि मृत शगूनची ओळख झाली होती. दोघंही घटस्फोटित असून त्यांना मूलबाळ नव्हतं. यानंतर दोघांतील ओळखीच रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघंही इंदूर येथील लसुडिया परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान पुण्याला जाण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यातूनच शगूननं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
0 Comments