कर्नाटक राज्यात एका शैक्षणिक संस्थेकडून मुस्लिम मुलींवर हिजाब घालण्यावर बंदी घातल्या निषेधार्थ व हिजाब बंदीच्या समर्थनात शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी बुलडाणा शहरात मोर्चा, निर्दशने आणि आंदोलन होवून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकते या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी कलम 144 लागू करण्यात आली आहे. या दिवशी मोर्चे निर्दशने किंवा आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय 4 पेक्षा जास्त व्यक्ती देखील एक सोबत फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रल्हाद काटकर, ठाणेदार शहर पोलिस स्टेशन बुलढाणा.
0 Comments