ही आग लाकडाच्या गोदामात लागल्याने काहीच वेळात आगीने भीषण रूप धारण केलं. अग्निशमन दल सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.
मुंबई 10 जानेवारी : आज पहाटे मुंबईतील भायखळा परिसरातील माझगाव (Mazgaon Byculla Fire) येथे एका लाकडाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली (Major Fire Breaks out In Wooden Shop). काही वेळातच आगीने रूद्ररुप धारण केलं. यानंतर सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. सध्या अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
ही आग लाकडाच्या गोदामात लागल्याने काहीच वेळात आगीने भीषण रूप धारण केलं. अग्निशमन दल सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून कोणी जखमी झाल्याची माहितीही समोर आलेली नाही.
ही आग नेमकी कशी किंवा कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. याचा तपास केला जाईल.
0 Comments