-->

Ads

आज पासुन प्राथमिक शाळेची घंटा वाजली... लहान मुलां मध्ये आनंदाचे वातावरण..



३डी न्यूज प्रतिनिधी कुलदीप कोळी उरण - रायगड

             उरण : रा. जि. प. शाळा चिरनेर ता. उरण येथे आज तब्बल पावणे दोन वर्षांनंतर शासन परिपत्रकानुसार इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग 1 डिसेंबर पासून कोव्हिड संबंधित सर्व नियमांचे पालन करून सुरू करण्यात आले.

 

          शाळेच्या प्रवेश द्वारावर फुगे, रांगोळी इ. सजावट करून मुलांना फुगे देऊन स्वागत केले. मागील दोन शैक्षणिक वर्षातील पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना चाॅकलेट, पुष्पगुच्छ, पेन्सिल ( अक्का देवी ट्रस्ट चिरनेर) यांजकडून देऊन नवागतांचे स्वागत केले. मुख्याध्यापक  प्रविण म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  शरयू ठाकूर. व सदस्या तसेच शिक्षक  विश्वनाथ गावंड,  सुरेश पाटील,  रंजना कोळी,  संगीता गावंड,  रोहिदास शिंदे,  चैताली  म्हात्रे उपस्थित होते.

       आज पासुन शाळा चालू झाल्याने मुलांच्या चेहर्यावर आनंद  दिसत होता.

Post a Comment

0 Comments