-->

Ads

अंबरनाथमध्ये गरजू अपंग व्यक्तींना विविध वस्तूंचे वाटप.. जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग विकास सेवाभावी संस्थेचा उपक्रम..


                    शुक्रवार दि. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त अंबरनाथमधील अपंग विकास सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरातील काही गरजू अपंग व्यक्तींना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले, पश्चिमेकडील कोहोजगाव परिसरातील कै. अनंता पाटील ज्येष्ठ नागरिक कट्टा याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



         अपंग विकास सेवाभावी संस्था, अंबरनाथ ही संस्था गेल्या ८ वर्षापासून अंबरनाथ शहरासह संपूर्ण ठाणे जिल्हातील अपंग बांधवांकरिता त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनाचे आणि विविध उपयोगी उमेद वाढविण्याचे कार्यक्रम राबवीत आहे. सदर संस्थेचे एक हजार तीस सदस्य आहेत. अपंगांना समाजातील मुख्य प्रवाहात सामील करुन घेणे हा यामागील उद्देश आहे. तसेच दरवर्षी अपंग दिनाच्या निमित्ताने बांधवांना तीन चाकी सायकली, कुबड्या, कॅलिपर, जयपूर फुट, व्हिलचेअर, ब्लाइंड स्टिक, एल्बो कुबडी, वॉकर इत्यादी कृत्रिम साहित्याचे वाटप सामाजिक  बांधिलकी जपणाऱ्या हितचिंतकांच्या सहकार्याने करत असते. या व्यतिरिक्त ही सदर संस्था अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवित असते. शुक्रवारी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून संस्थेने काही गरजू अपंगांना विविध साहित्य वाटप केले. यावेळी माजी नगरसेवक उमेश पाटील, मिलिंद पाटील, सचिन पाटील, अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजी धल, हितेश कोठारी, चंद्रकांत गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

      कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक किशोर धुमाळ, अध्यक्षा कल्पना धुमाळ, सचिव रोजमिली दाविद सनाटे, अलका शेलार, उपाध्यक्ष शंकर धोडके, तुकाराम ब

बालस्कर आदींनी मेहनत घेतली.


उस्मान शाह, अंबरनाथ

Post a Comment

0 Comments