-->

Ads

कल्याण डोंबिवली मध्ये नायजेरिया मधून आले सहा प्रवासी.. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आरटी पीसीआर सॅम्पल तपासणी केली सुरू ..



               कल्याण : दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी करोना ग्रस्त असल्याचे स्पष्ट होताच सतर्क झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने आंतरराष्ट्रीय प्रवासातून आलेल्या नागरिकांची शोध मोहीम सुरू केली आहे नायजेरिया मधून आलेले सहा प्रवासी सापडले असून या प्रवाशांचे आरटी पीसीआर सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत तर पॉझिटिव्ह रुग्ण बरोबर विमानातून प्रवास केलेल्या 42 जणांची यादी आरोग्य विभागाने शासनाकडे पाठवली असून या सर्व 42 जणांची rt-pcr टेस्ट त्या-त्या महापालिकांकडून केली जात आहे या करोनाग्रस्त प्रवाशाचा सह प्रवासी असलेलया 50 वर्षीय गृहस्थाची आज करोना टेस्टिंग केली जाणार आहे तर दुसरीकडे रुग्ण सापडलेल्या इमारती मधील सर्व नागरिकांचे थुंकीचे नमुने देखील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. असे असले तरी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाच्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालाबाबत आरोग्य विभागाला अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नसल्याचे पालिकेच्या साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले

Byte : प्रतिभा पानपाटील ( केडीएमसी साथ रोग नियंत्रण अधिकारी )

Post a Comment

0 Comments