३डी न्यूज प्रतिनिधी कुलदीप कोळी उरण - रायगड
रायगड : उरण मधील पंचायत समिती येथे सुरु असलेल्या नूतनीकरणाच्या कामात खोदकाम करत असताना तेथे पुरातन तोफ असल्याचे कॉन्ट्रॅक्टरला आढळून आले, त्या नंतर त्यांनी ही सदर माहिती पुरातत्व विभागाला दिली त्या नुसार पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि त्यानंतर पुरातन तोफ असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन सदर तोफ jcb च्या साहाय्याने काढण्यात अली या वेळी पुरातन तोफ पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी जमा झालेली पाहायला मिळाली. या मिळालेल्या पुरातन तोफेवर योग्य ते संशोधन करून त्याची माहिती काढण्यात येणार असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.
0 Comments