-->

Ads

मावस भावाबहिणीची प्रेमप्रकरणातून आत्महत्या कुटुंबियांचा लग्नास नकार आर्णी तालुक्यातील घटना


सख्या मावस बहिण-भावाचं एकमेकांशी प्रेम झालं. मात्र कुटुंंबियांचा प्रचंड विरोध असताना त्यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना गुरुवार, 16 डिसेंबरला सकाळी आर्णी तालुक्यातील गुढा येथील गिढाई टेकडीजवळ उघडकीस आली. विशाल दत्ता आगीरकर (वय 28, राणी धानोडा, ता. आर्णी) आणि पूनम संजय राऊत (वय 18, बोंडगव्हाण, जि. नांदेड) अशी या मृत सख्या मावस बहिण-भावाची नावे आहेत.


आर्णी तालुक्यातील राणी धानोडा येथील विशाल आगीरकर आणि नांदेड जिल्ह्यातील पूनम राऊत यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. मात्र या दोघांच्या प्रेम विवाहाला दोन्ही कुटुंबातून विरोध होता. त्यामुळे त्या दोघांनी पळून जात पारवा पोलिस ठाण्यांतर्गत सावळी दूरक्षेत्रामधील गुढा येथील गिढाई टेकडीजवळ विष प्राशन करीत जीवनयात्रा संपविली.

घटना गुरुवारी सकाळी उघडकीस येताच खळबळ उडाली. गावातील शेकडो नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती गुढा गावचे पोलिस पाटील नितीन खोडे यांनी पारवा पोलिसांना दिली. या आत्महत्येचे गांभीर्य लक्षात घेता पारवा पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पाहाणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार गजानन शेजुलकर व सुरेश येलपुलवार करीत आहेत

Post a Comment

0 Comments