-->

Ads

जिव्हाळ्याची गोड दिवाळी या उपक्रमा चा उदघाटन शुभारंभ संपन्न.. दानशूर दात्यांच्या सहकार्याने शेकडोंना दिवाळी साहित्या ची मदत..

 “चलो जलाये खुशियो के दिप वहां ...

जहां आजभी अंधेरा है... या काव्य रचणे प्रमाणे” 



               उमरखेड : यवतमाळ जिल्ह्यात अतिशय दुर्गम भागामध्ये कार्यरत असलेलेया इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त व ISO 9001 2015 मानांकन प्राप्त जिव्हाळा संस्था उमरखेड जि. यवतमाळ महाराष्ट्र राज्य  सामाजिक कार्यात नेहेमी अग्रेसर असणाऱ्या कमी कालावधी मध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सामाजिक क्षेत्रा मध्ये मागील 10 वर्षा पासून  महाराष्ट्रातील  यवतमाळ, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये  सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्थे ने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जिव्हाळ्याची गोड दिवाळी (एक हात मदतीचा)हा सामाजिक उपक्रम आयोजित केला दिनांक 03-11-2021 रोजी उमरखेड येथे उमरखेड चे तहसीलदार आनंद देऊळगावकर व पुसद चे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते इंदिरा नगर व सावित्रीबाई फुले नगर येथील शेकडो मुलीना , मुलांना निराधारांना व उपेक्षितांना संस्थे च्या वतीने दानशूर दात्यांच्या सहकार्याने फराळ पोकेत व मोतीचूर लाडू पोकेट वाटप करून जिव्हाळ्याची गोड दिवाळी या उपक्रमा चा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ते म्हणाले कि जिव्हाळा संस्थे नेहेमी समाजतील गोर गरीब उपेक्षित नागरिकानसाठी आहोरात्र निस्वार्थ मेहनत  घेत असते जिव्हाळा संस्थे चे कार्य वाखाणण्या जोगे आहे से  बोलून संस्थे च्या कार्याचे थोंड भर कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या नंतर जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल लताताई राम मादावार यांनी सांगिले कि संस्था दर वर्षी हा उपक्रम फार मोठ्या  प्रमाणात मुलीना , मुलांना निराधारांना उपेक्षितांन, भिक्षुक व उसतोड कामगारांनसाठी हा उपक्रम संस्था दानशूर दात्यांच्या लोकसभागातून राबवीत असते आज या शुभारंभ करून जिव्हाळा टीम एक आठवडाभर उमरखेड, हादगाव व महागाव परिसरातील शेकडो उपेक्षितांना दिवाळी साठी वाटप करणार आहोत.  सरते शेवटी त्यांनी सर्व जनते ला विनंती केली कि या सर्व उपेक्षितांनच्या पोटात दिवाळी चे दोन घास  गोड जावे या करीता उपक्रमा करीता जसी जमेल तशी फुल ण फुलाची पाकळी मदत करावी हि विनंती असे ते म्हणाले. या  कार्यक्रमा प्रसंगी उमरखेड चे तहसीलदार आनंद देऊळगावकर ,  पुसद चे तहसीलदार राजेश चव्हाण, मंडळ अधिकारी सचिन फटाले, मारोती कोतेवार, लोकमत तालुका प्रतिनधी अविनाश खंदारे, अरुण पळसकर, जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल लताताई राम मादावार ,  चंद्रकांत खेवलकर, सतीष हंबीर , रोहित अलमुलवार शिवा जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments