ढाणकी : ढाणकीत एका विवाहित महिलेवर परपुरूषा सोबत शारिरीक संबध प्रस्थापित करण्यासाठी पत्नीवर जुलम जबरदस्ती केली. हि घटना दिनांक सोळा नोव्हेंबर च्या रात्री साडे नउ वाजताच्या दरम्यान घेडली. त्यामुळे बिटरगांव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात रवानगी केली.
घटनेचे सविस्तर वृत्त असे की, फियार्दी महिलेचा पती हा एका निवासी शाळेवर स्वयंपाकी म्हणुन हुददयावर कार्यरत आहे. घटनेचे दोन दिवस अगोदरच फिर्यादी चे पतीने ढाणकी शहरात घर भाडयाने घेतेले होते. घटनेच्या दिवशी फिर्यादीचा पती व त्याचा आरोपी मित्र फिर्यादीच्या घरी मुक्कामाला थांबला होता. तयाच दिवशी फिर्यादीचा पती आणि त्याचा मित्र यांनी मनमुराद मद्य प्राषन केले होते. जेवण खावन आटोपल्या नंतर फिर्यादी महिला आणि तिचा पती एका रूम मध्ये झोपले व दुसरा आरोपी वेगळया खोलीत झेापला होता.
सर्वत्र रात्री ची शांतता पसररल्या नंतर फिर्यादीच्या पतीने फिर्यादी महिलेला मित्रासोबत शारिरीक सुख घेण्याची इच्छा नसतानाही जबरी केली. फिर्यादी महिलेने पर पुरूशा सोबत शारीरिक संबध प्रस्थापित करण्यास नकार देताच तिला मारहान करण्यास सुरवात केली. व जिवे मारण्याची धमकी देवुन मित्र झोपुन असलेल्या खोलीमध्ये तीला जबरदस्तीने ओढीत नेले आणि शारिरीक संभोग करण्यास भाग पाडले. जिवे मारण्याच्या भितीने त्या परपुरूषा सोबत कसीबशी रात्र फिर्यादी महिलेने काढली आणि दुस-या दिवशी सकाळी माहेरकडील मंडळी सोबत बिटरगांव पोलीस स्टेशन गाठुन आपबिती सांगीतली. आरोपी विरोधात भांदवि कलम 376, 323,506,109 सोबत अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे नोंद करून दोन्ही आरोपीला अटक करून न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात रवानगी केली. या गुन्हाच्या तपास उमरखेड, पुसद उपविभागीय पोलीस अध्किारी प्रदिप पाटील, ठाणेदार प्रताप भोस, उपनिरीक्षक कपिल मस्के, रवी गीते, मोहन चाटे, सतीश चव्हाण, निलेश भालेराव, स्वप्नील रायवाडे, गजानन खरात, देविदास हाके, मारोती वंजारे,रूपेश चव्हाण व त्यांचे सहकारी करत आहेत.
0 Comments