अंबरनाथ पोलीस स्टेशन हददीत दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास जुन्या रेल्वे पटरीच्या बाजुला, स्वामीनगर, अंबरनाथ पश्चिम येथे एक बेवारस अनोळखी महिला वय अंदाजे ४५ वर्षे, अंगात नेसुस हिरव्या रंगाचे ब्लाउज घातलेली व अंगावर पांढरी चादर ओढलेली. नाकावर जुन्या जखमाचे व्रण असलेली महिला ही निपचित अवस्थेत पडलेली मिळुन आल्याने त्यांना उपचाराकामी सेंट्रल हॉस्पीटल, उल्हासनगर येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन मयत घोषीत केले आहे. सदर बाबत अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यु प्रमाणे नोंद झालेली आहे.
सदर मृत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी अंबरनाथ पोलीस प्रयत्न करत आहे, तरी आपल्यापैकी कोणी यांना ओळखत असल्यास अंबरनाथ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन अंबरनाथ पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.
उस्मान शाह, अंबरनाथ
0 Comments