रविवारच्या सुट्टीची मजा बेतली जीवावर दोन तासांपासून अग्निशमन दलाच्या जवानांचा शव शोधण्यासाठी प्रयत्न
अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मी टेकडी येथे राहणारी 2 मुलांचा चिखलोली डॅम मध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे, सार्थक वय वर्षे 15 व महादेव वय वर्षे 16 अशी या 2 मुलाची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे.
रविवारच्या सुट्टीची मजा या मुलांच्या जीवावर बेतली असून यामुळे महालक्ष्मी नगर परिसरात शोककळा पसरली आहे.दरम्यान अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून गेल्या 2 तासापासून शव शोधण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.
उस्मान शाह, अंबरनाथ
0 Comments