Girl patient raped in Hospital: रुग्णालयात तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, रुग्णालयात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ळालेल्या माहितीनुसार, 18 जुलै रोजी ट्रेन अपघातात ही मुलगी जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रु्गणालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री 22 वर्षीय तरुणी ही आपल्या बेडवर बराचवेळ दिसली नाही. यानंतर रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी शोधाशोध सुरू केली. सुरक्षारक्षकांना बाथरूमच्या बाहेर रडताना आवाज आला. तसेच किंचाळण्याचाही आवाज आला. त्यानंतर नर्सेसने बाथरूममध्ये पाहिले असता पीडित मुलगी तेथे आढळून आली.
नागपुरात एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून आरोपीची पीडित तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत अनेकदा अत्याचार केला आहे. दरम्यान पीडित तरुणी दोन वेळी गर्भवती राहिली होती. त्यामुळे आरोपीनं दोन्ही वेळेस गर्भपात करण्यास भाग पाडलं आहे. याप्रकरणी पीडित तरुणीनं कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
रोशन असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव असून तो कळमना येथील ओमनगर परिसरातील रहिवासी आहे. तर 21 वर्षीय पीडित तरुणी एमबी फायनान्स अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. पीडित तरुणीची दोन वर्षांपूर्वी आरोपीशी फेसबुकवर ओळख झाली होती. यानंतर दोघंही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत होते. दरम्यान, 2020 मध्ये फिर्यादीच्या वाढदिवशी आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवत पंचमढी येथे फिरायला घेऊन गेला.

0 Comments