रायगड : प्रदुषणरहित वाहनांना चालना देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ' महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण राबवण्यास मान्यता दिली आहे . या धोरणानुसार आगामी काळात राज्यात इलेक्ट्रीक वाहनांचा बोलबाला राहणार आहे . यासाठी मोठ्या प्रमाणात ई - वाहनांना प्रोत्साहन देण्याचे हे धोरण आहे . पुढील सहा महिन्यांनंतर म्हणजे अंदाजे एप्रिल 2022 पासून शासकीय ताफ्यात ई - वाहनांचा समावेश राहणार आहे . रायगड जिल्ह्याच्या आगारातून 57 इलेक्ट्रॉनिक बस धावणार आहेत. अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन, कर्जत, मुरुड, माणगाव, रोहा या आगारातून बसेस जाणार आहेत. रायगड आगारातील बसेससाठी दररोज 24 हजार लिटर डिझेल लागत आहे, यामध्ये बचत होणार आहे. मध्यम पल्ला 150 ते 250 ते लांब पल्ला 250 ते 300 येऊन जाऊन असा असणार आहे. तालुका ते जिल्हा या मार्गावर बसेस धावणार आहेत. एसटी महामंडळाने देखील आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे . दोन वर्षांपासून सुरु असलेले कोरोनाचे संकट आणि दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या किमतीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे . अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आता इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी महामंडळाने देखील पुढाकार घेतला आहे . विजेवर चालणाऱ्या या बसेस मुळे प्रदूषण रोखणे व डिझेलच्या किंमती मुळे होणारे आर्थिक नुकसान टाळणे असा दुहेरी फायदा महामंडळाला होणार आहे . पनवेल , मुंबई , बोरिवली या मार्गावर धावणार बसेस अद्याप इलेक्ट्रिक बस प्रस्तावित असून , जास्त प्रवासी फेऱ्या मार्गावर या बस धावणार याचे नियोजन करण्यात आले आहे . रायगड जिल्ह्यातून मुबंई , बोरिवली उपनगर व पनवेल या मार्गावर ही बससेवा दिली जाणार आहे . या बसची महामंडळातील कर्मचाऱ्यांसोबतच प्रवाशांनाही उत्सुकता लागून राहिली आहे.
प्रतिनिधी पवन भोईर रायगड

0 Comments