शिवसेना शहर शाखा व जय भवानी पारंपरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून हिंदूहृदयसम्राट मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांचे 80 % समाजकारण 20 % राजकारण हा मूलमंत्र हाती घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहणानुसार परिसरातील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण मिळावे या उद्देशाने शिवसेना शहरप्रमुख व मा.नगराध्यक्ष अरविंद शिवलिंग वाळेकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली दिनांक 9 /10 /2021 ते 16 /10/2021 सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मोफत कोरोना लसीकरण पहिला व दुसरा डोस भवानी मंदिर, शिवसेना शाखा, भवानी चौक, अंबरनाथ पश्चिम येथे देण्यात येणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती शिवसेना शहरप्रमुख व मा.नगराध्यक्ष अरविंद शिवलिंग वाळेकर आणि अंबरनाथ शिवसेनेकडून करण्यात आली आहे .
सोबत :- आधार कार्ड आणणेआवश्यक आहे.
३डी न्यूज प्रतिनिधी राहुल भोईर अंबरनाथ
0 Comments