आपल्या मित्राकडून 500 रुपये घेऊन पत्नीवर बलात्कार (Man allowed to rape her wife for Rs. 500) करण्याची परवानगी एका पतीने दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अशी घडली घटना
राजस्थानमधील शेखावाटी परिसरात राहणारा तरुण आपल्या पत्नीला घेऊन गावाबाहेरच्या एका हॉटेलात गेला होता. तिथं त्याचा मित्र सोनू शर्मा त्याला भेटला. पतीने सोनू शर्माकडून 500 रुपये घेतले आणि आपल्या पत्नीवर बलात्कार करण्याची परवानगी दिली. त्यानंतर सोनूने मित्राच्या पत्नीला गावाबाहेरील निर्जन ठिकाणी नेत तिच्यावर बलात्कार केला. माणुसकीला आणि नात्यांना काळीमा फासणारी ही घटना उजेडात आल्यावर एकच खळबळ उडाली.
पत्नीने फोडली वाचा
आपल्या पतीकडून झालेला विश्वासघात आणि त्याच्या मित्राकडून झालेला बलात्कार कदापि सहन न करण्याचा निर्धार करत महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. पती आणि मित्राविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत दोघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील शक्य ते सर्व पुरावे गोळा केले आहे. यामध्ये बलात्कार करताना आरोपीनं वापरलेल्या गर्भनिरोधक साधनांपासून ते महिलेच्या वेगवेगळ्या तपासण्यांपर्यंत अनेक बाबींचा समावेश आहे.
पोलीस तपास सुरू
मानवी नात्यांना आणि विश्वासाला काळीमा फासणारी ही घटना उजेडात आल्यावर पोलीस सक्रीय झाले असून काही तासांच्या आत त्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

0 Comments