-->

Ads

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या गळफास घेऊन संपवले जीवन

उमरखेड तालुक्यातील कृष्णापुर येथील घटना



उमरखेड :-प्रतिनिधी संजय जाधव

उमरखेड तालुक्यातील कृष्णापुर   येथील अल्पभुधाक शेतकरी  अर्जुन रामचंद्र आडे वय 43 यांनी कर्जाला कंटाळुन टेकडीवर जाऊन टॉवरला गळफास घेऊन  आत्महत्या केलीढाणकी येथून जवळच असलेल्या उमरखेड तालुक्यातील कृष्णापुर येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी अर्जुन आडे यांनी  गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

मृतक शेतकरी यांच्या वर  विविध सहकारी सोसायटी ढाणकी यांचे कर्ज असल्याचे समजते.व त्याच कर्जाच्या परतफेडीची काळजी त्यांना असल्याचे बोलल्या जात आहे त्यांच्या मागे आई  पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा कुटूंब आहे. जमीनीत काबाळ कष्ट करून अर्जुन आडे आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होता त्याच्या अशा टोकाच्या निर्णया मुळे संपूर्ण कुटूंब उघड्यावर आले असून त्याच्या कुटूंबियाची शासकीय मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments