-->

Ads

व्‍यंग्‍यचित्रकार प्रभाकर दिघेवार राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित..



             उमरखेड : व्यंगचित्रकले द्वारे उमरखेड नगरीचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार तथा महावितरण कंपनीत कार्यरत प्रधान यंत्रचालक प्रभाकर दिघेवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

         प्रभाकर दिघेवार गेल्या जवळपास २५ वर्षांपासून व्यंगचित्रकला क्षेत्रात कार्यरत असून ते आपल्या कलेद्वारे अनेक सामाजिक तसेच ज्वलंत प्रश्नांवर सतत जनजागृती करीत असतात. त्यांचे पर्यावरण क्षेत्रातील कार्यही उल्लेखनीय आहे. दिवसेंदिवस निसर्गाच्या ऋतुचक्रात होत असलेला बदल व त्यामुळे शेतकऱ्यांवर कोसळणारे संकट यावरही त्यांनी अनेक व्यंगचित्रांव्दारे प्रकाश टाकला आहे.वृक्षसंवर्धन ,पाणी बचत ,वीज बचत,रेन हार्वेस्टिंग ,हागणदारी मुक्त गाव, स्वच्छता अभियान ,इत्यादी अनेक विषयावर व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते सतत जनजागृती करीत असतात. त्यांची एकूण व्यंगचित्रकार क्षेत्रातील तसेच सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्य पाहून त्यांना सन २०२१च्या राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वर संस्थान येथे आज एका छोटेखानी कार्यक्रमात श्री गोपालभाऊ अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.विजय माने साहेब, भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री अशोक वानखेडे, एपीआय गाडे साहेब, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे पूर्व महाराष्ट्र अध्यक्ष दीपक ठाकरे ,सर्व सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments