उमरखेड - उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टाकळी गट ग्रामपंचायत मध्ये इसापूर पिंपळवाडी येथील जि.प शाळा १ ते ५ पर्यंत वर्ग आहे. सदर शाळे मध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची व्यवस्था नाही, दूषित पाणी पिऊन विद्यार्थ्यांची प्रकृती खराब होत आहे सदर शाळेमध्ये खेळण्याचे साहित्य नाही कोणत्याच प्रकारे उपाययोजना झालेली नाही आहे शाळेच्या आजूबाजूला सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या लॉक डाऊन सुरू असल्याकारणाने सध्या शाळा बंद आहे तरीपण इसापूर पिंपळवाडी येथील शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण देत आहे अभ्यासक्रम देत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सदर शाळेमध्ये आरो प्लांट बसून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच शाळेमध्ये विद्युत मिटर ची व्यवस्था करावी.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इसापूर पिंपळवाडी दोन वर्ग खोली डिजिटल करण्यात यावे व तसेच परिसरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, ग्रामपंचायत ला वारंवार सूचना देऊन सुद्धा ते दुर्लक्ष करीत आहेत व तसेच शाळेला १५ वा वित्त आयोग मधून जास्तीत जास्त निधी देण्यात यावा, शाळेला वॉलकंपाउंड करण्यात यावे ह्या प्रकारचे निवेदन उमरखेड पंचायत समितीचे बि. डी. ओ. प्रवीण वानखेडे यांना देण्यात आले.
उमरखेड प्रतिनिधी संजय जाधव
0 Comments