नव्याने उभारलेल्या जात असलेल्या गृहसंकुलात लावल्या जाणा:या 78 एसी चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. धक्कादायक म्हणजे पाच चोरटय़ांनी या एसी फेरीवाल्यांसारख्या रस्त्यावर विकल्या. मानपाडा पोलिसांनी शिताफीने पाचही चोरटय़ांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या एसी पैकी 20 एसी हस्तगत केल्या आहेत.
कल्याण शीळ रस्त्यावर दावडी परिसरात रिजेन्सी अनंतम् हे गृह संकुल उभारण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक फ्लॅटमध्ये तीन एअर कंडीशनर लावून देण्याचे काम सुरू आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात गृहसंकुलाच्या प्रत्येक फ्लोअरवर एसी आणून ठेवल्या होत्या. 21 ऑगस्ट रोजी सुपरवायझरला लक्षात आले की, 78 एसी गायब आहेत. त्वरीत याची तक्रार मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली. डीसीपी विवेक पानसरे एसीपी जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अविनाश वनवे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासात प्राथमिक माहिती समोर आाली की, 20 ऑगस्ट रोजी विनोद महतो हा तरुण गृह संकुलाच्या वॉचमनला भेटला होता. त्यानेच ही चोरी केली असेल. कारण तो काही दिवसापूर्वी गृहसंकुलात काम करीत होता. नुकतेच त्याने काम सोडले होते. त्याची ओळख असल्याने त्याला कोणी हटकले नाही. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिस अधिकारी वनवे यांनी तपासाची सूत्रे फिरविली. या प्रकरणात रहेमान खान आणि दीपक बनसोडे या दोघांना ताब्यात घेतले. हे दोघे खाजगी कॉलसेंटरमध्ये गाडी चालक आहेत. त्यानंतर पोलिसांनी विनोद महतो, सलीम रशीद आणि आदील कपूर या तिघांनाही ताब्यात घेतले. या पाचही जणांनी मिळून जवळपास 78 एसी चोरी केल्या. त्यापैकी 20 एसी पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. धक्कादायक या चोरटय़ांनी रस्त्यावर उभे असलेल्या फेरीवाल्यासारख्या या एसी वसईत विकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहेत. या पाचही जणांनी कमी वेळेत जास्त पैसे कमाविण्याच्या नादात हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.
0 Comments