-->

Ads

अल्पवयीन मुलाचा खोडसाळपणा .... डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान रुळावर दगड ठेवले.. अल्पवयीन मुलगा ताब्यात साथीदाराचा शोध सुरु.. डोंबिवली रेल्वे पोलिसांची कारवाई..

 


धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याच्या घटनांनंतर आता ट्रॅकवरही दगडी ठेवण्याचा प्रकार डोंबिवलीत रेल्वे स्थानकानजीक उघडकीस आला आहे.

डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांच्या दरम्यान रुळावर काल सायंकाळच्या सुमारास  दगडी ठेवलेल्या आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती .या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला .गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती व तांत्रिक तपास करत या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे .खोडसाळपणाने त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसानी दिली दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या कर्जत लोकल च्या मोटरमन च्या रुळावर दगड ठेवल्याचे लक्षात आले त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत लोकल थांबवत या बाबत रेल्वेला माहिती दिली व हा प्रकार उघडकीस आला.

Post a Comment

0 Comments