-->

Ads

बदलापूर विजवितरणचा भोंगळ कारभार,पोलवरच चिकटला वायरमन प्रकृती चिंताजनक,


बदलापुर विज वितरण कंपनिचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे



बदलापुर

, मध्यंतरी लाॅकडाऊनच्या काळात कोणतिही माहिती न घेता नागरिकांना मोठ्या प्रमाणात बिल आकारली असताना नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच विजवितरण कंपनी स्वताच्याच कामागाराच्या जिवाशी खेळ खेळताना दिसत असल्याचे भयानक सत्य समोर आले आहे, कुळगाव बदलापुर पुर्व बदलापुर विजवितर कंपनिचा भोंगळ कारभारामुळे आज एका वायरमनचा जिव जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वांगणी या ठिकाणी राहत असलेल्या हरि वंजाले नामक शिकाऊ कामगाराला बदलापुर पुर्व मोहन पाम आंबेडकर चौक परिसरातील एका पोलवर दुरुस्तीच्या कामा साठी चढवून तो काम करत असताना दुसऱ्या वायरमनने कोणतीही शहानिशा न करता मेन लाईन चालु केल्याने सदर पोलवर काम करित असलेला कामगार शाॅक लागुन लटकत असताना नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर विजवितरण अधिकाऱ्यांनी धाव घेत मेन सप्लाय बंद घेत पोलला चिकटून असलेल्या व्यक्तींची सुटका करून त्याल धन्वंतरी हाॅस्पिटल मध्ये दाखल केले असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments