मॅंचेस्टरमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडने वेस्ट इंडिजचा 113 धावांनी पराभव केला. 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडिजचा संपूर्ण संघ केवळ 198 धावांत गारद झाला.
मॅंचेस्टरमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडने वेस्ट इंडिजचा 113 धावांनी पराभव केला. 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडिजचा संपूर्ण संघ केवळ 198 धावांत गारद झाला. इंग्लंडचा एकच खेळाडू विंडिजच्या 11 खेळाडूंवर भारी पडला, तो आहे बेन स्टोक्स (Ben Stokes).
स्टोक्सने मॅंचेस्टर कसोटी सामन्यात ऑलराउंडर खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. स्टोक्सच्या खेळीच्या जोरावर तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने 1-1ने बरोबरी केली आहे
स्टोक्सने या सामन्यात 254 धावा करत तीन विकेटही घेतल्या. एवढेच नाही तर या कसोटी सामन्यात स्टोक्सने आपल्या नावावर अनेक विक्रमही केले.
बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंडचा पहिला खेळाडू आहे, ज्यानं एका कसोटी सामन्यात 250हून अधिक धावा केल्या आहेत. यासह 2 विकेटही घेतल्या. अशी कामगिरी करणारा स्टोक्स जगातला 8वा खेळाडू आहे. 2009मध्ये स्टोक्स अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला होता
स्टोक्सने दुसऱ्या डावात केवळ 36 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून सलामीच्या फलंदाजाने कसोटीत केलेले हे सर्वात जलद अर्धशतक आहे. पहिल्यांदाच स्टोक्सने कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी केली.
स्टोक्स सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं या मालिकेत आतापर्यंत 114.33च्या सरासरीने 343 धावा केल्या आहेत. तर, गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास 9 विकेटही त्याने घेतल्या.






0 Comments