सोमवारीही बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त होती. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 59.34 एवढं झालं आहे.
मुंबई 28 जुलै: राज्यात आज 10 हजार 333 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णाची संख्या अधिक आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात जास्त संख्या असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. (Covid-19 Patient) आज राज्यात 7 हजार 700 नवे रुग्ण आढळून आलेत. नवीन रुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असली तरी मृत्यूचा आकडा मात्र कमी होत नाही. आज राज्यात 282 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारीही बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त होती. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 59.34 एवढं झालं आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 3,91,440 एवढी झाली आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये हर्ड इंम्युनिटीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल 57 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या आहेत. पालिका आणि इतर संस्थांच्या एकत्रित सेरॉलॉजीकल सर्वेत हे सिद्ध आल्याचा माहिती आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या दुसऱ्या सर्वेक्षणात हर्ड इम्म्युनिटी बाबत निष्कर्ष जाहीर करण्यात येणार आहे.
सरकारचं सर्व लक्ष आणि हॉटस्पॉट ठरलेल्या मोठ्या शहरांवर आहे. त्याच बरोबर शहरांमधून ग्रामीण भागाकडे ही साथ पसरू नये यावरही लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

0 Comments