-->

Ads

रेणुकाच्या यशाच्या शिखराला दुःखाचे खिंडार

तब्बल 93.20%मार्क मिळवून सुद्धा पाठीवर शाब्बासकीची थाप मारणाऱ्या आईचे निकालाच्या पुर्वसंधेला सर्पद्वंशाने निधन





आमचे प्रतिनिधी शुभम तुपकरी यांचा हा मन हेलावुन टाकणारा रिपोर्ट
   
मायेची सावली,आई,घराचा आधार बाबा मी पास झाले हो पण सांगु कुणाला ?
          माणसाला दुःख सुद्धा असावीत ,कारण सुखाची किम्मत समजली पाहीजे,पण एखाद्याच्या जिवनात दुःखाचा पुरच यावा व सुखाचा लवलेशही उरु नये अशीच ही घटना.
नाव रेणुका दिलीप गुंडरे ! ही लातुर जिल्ह्यातील होकर्णा या छोट्याशा गावातील एका गरीब कुटुंबातील मुलगी ! वडीलांचे नऊ  वर्षापुर्वीच हृदयविकाराने निधन झाल्याने सर्व जिम्मेदारी तीच्या आईवर पडली.आईला त्या गोष्टीचा ताण पडु नये म्हणुन रेणुकाने सुट्टीच्या दिवशी शेतात मजुरी करुन आईला मदत करत अचाट मेहनत करुन जिद्दिने अभ्यास केला .दि.29 रोजी तीचा निकाल आला आणि तब्बल 93.20% गुण घेत घवघवीत यश संपादन केले.पण हा आनंदाचा क्षण बघण्यापुर्वीच दि.28 रोजी रेणुकाच्या आईचा शेतात काम करतांना सर्पद्वंशाने मृत्यु झाला.
मार्क मेमो हातात पडताच रेणुकाने जोरात हंबरडा फोडला आई- बाबा मी पास झाले,पण सांगू कुणाला! या हृदय हेलावुन सोडणाऱ्या वाक्याने  होकर्णा गावात अश्रुंचा जनु पुरच आला .
       आता रेणुका पोरकी झाली देवाने वडील नेले,आधारवड असलेली आई सुद्धा हीरावुन घेतली! जगणे असह्य झाले.दोन लहान बहीनींचे ओझेही या पंधरा वर्षाच्या रेणुकाला सोसायचे आहे. या ओझ्याने रेणुका मोडुन पडु नये ,ती आयुष्यात ताठ उभी राहण्यासाठी समाजातुन दानसुरांचे हात समोर आले पाहीजेत,राजकारण्यांनी या चिमुकलीला बळ दिलं पाहीजे  तरच ती टीकेल.

रेणुका हार माणु नको,अनेकांच्या मदतीच्या रुपाने देव तुला भेटायला येणार आहे,ईश्वर तुला जगण्याचं बळ देवो हीच आमच्या सी.के.मराठी न्युजकडुन ईश्वर चरणी प्रार्थना!

प्रतिनिधी शुभम तुपकरी हदगांव- नांदेड

Post a Comment

0 Comments