दोन्ही भाऊ पोलीस विभागात हवालदार म्हणून कार्यरत
अंबरनाथ प्रतिनिधी : उस्मान शाह
अंबरनाथमध्ये कोरोनाचा प्रसार कमी होण्याचे नावच घेत नाही. या आजारामुळे, दोन सख्ख्या जुळ्या भावांचा 8 दिवसांच्या अंतराने मृत्यू झाला. दोन्ही भाऊ पोलिस विभागात कार्यरत होते. माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके असे आहे
. दोघेही पोलिस विभागात कार्यरत होते, त्यापैकी दिलीप घोडके हे उल्हासनगरातील हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये हवालदार म्हणून तैनात होते आणि जयसिंग बोडके हे अंबरनाथ पोलिस ठाण्यात हवालदार होते, एकाच दिवशी जन्मलेले हे जुळे भाऊ एकाच दिवशी पोलिस विभागात भर्ती झाले आणि दोघांनीही एकत्र प्रशिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच एकत्र राहिलेल्या या दोन भावांचा मृत्यूही एका आठवड्यात झाला हा एक योगायोगच सांगावे लागेल.
दिलीप घोडके यांचा 20 जुलै आणि जयसिंग घोडके यांचे 28 जुलै रोजी निधन झाले. परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या दोन पोलिस कर्मचार्यांच्या एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे पोलीस विभागात शोककळाचे वातावरण आहे.

0 Comments