चाचणीचा निकाल प्राप्त होण्यासाठीचा वेळ वाचणारदररोज ३०००चाचण्यां करण्याची क्षमताकल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, भिवंडी मनपा तसेच अंबरनाथ व कुळगांव, बदलापूर न.प. क्षेत्रातील नागरिकांना फायदा मिळणार
कल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांमधील वाढते कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात तसेच या चाचण्यांच्या निकाल लवकरात लवकर मिळाल्यास संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात उपचार घेता येतील, याकरिता कल्याण डोंबिवली मनपा क्षेश्रात कोरोना चाचण्यांसाठीची लॅब सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आले असून कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेची स्वत:ची पहिली कोविड१९ टेस्टिंग लॅब कल्याण – डोंबिवली महानगरपालिका आणि क्रशना डायग्नोस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीपी तत्वावर सुरु करण्यात येत आहे. गौरीपाडा, कल्याण पश्चिम परिसातील त्रिमूर्ती पार्क येथील महापालिकेच्या वास्तूमध्ये सदर लॅब उभारण्यात येत असून आज या लॅबची पाहणी करत तेथील यंत्रणेचा आढावा घेतला. याप्रसंगी महापौर सौ.विनिता राणे, माजी महापौर व स्थानिक नगरसेवक श्री.राजेंद्र देवळेकर, नगरसेवक श्री.विश्वनाथ राणे व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
या लॅबमध्ये दररोज ३००० चाचण्यां करण्याची क्षमता असून यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री ही क्रशना डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. नॅशनल एक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटोरीज (NABL) या संस्थेची मान्यता मिळाल्यावर येत्या आठवड्याभरात ही लॅब कार्यान्वित होईल.



0 Comments