कोयत्याने वार केल्यानंतर तरुणावर गोळी झाडण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
पुणे, 13 जुलै : पुण्यातील दत्तवाडीत मध्यरात्री खुनाचा थरार रंगला. शाहू वसाहतीत गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वारकरून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. अमित मिलिंद सरोदे (वय 21, रा. जनता वसाहत, गल्ली नं. 15) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आदर्श ननावरे, बोंबल्या आणि यशवंत कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अमित हा येथील शाहू वसाहतीसमोरील बालाजी होलसेलच्या जवळ थांबला असता अचानक आलेल्या तिघांनी त्याच्यावर हल्ला केला.
कोयत्याने वार केल्यानंतर तरुणावर गोळी झाडण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींना अमित सरोदे याचा खून नेमका कोणत्या कारणामुळे केला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दत्तवाडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

0 Comments