या घटनेमध्ये संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमध्येही संतापाचं वातावरण आहे
रोहा, 27 जुलै : राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे मोठं संकट ओढावलं आहे. अशात लॉकडाऊनमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तांबडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमध्ये संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमध्येही संतापाचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 जुलै रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात रोहा पोलीस स्थानका गुन्हा दाखल केला आहे. तर असा निर्दयी प्रकार कोणी केला याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे.
रम्यान, या घटनेमुळे रोहा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दखल घेतली असून उद्या मंगळवार 28 जुलै रोजी ते रोहाच्या दौ-यावर येत आहेत.
विरोधी पक्ष नेते दरेकर उद्या सकाळी सा़डे आठ वाजता ज्या ठिकणी त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यानंतर या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे कुटुंबीयांकडून तिचा शोध सुरु होता. अखेर रात्री उशीरा गावाबाहेर या मुलीचा मृतदेह सापडला.

0 Comments