-->

Ads

शेतात गेलेल्या मायलेकी घरी परतल्याच नाही, नाल्यात सापडल्या अशा अवस्थेत

यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील माय-लेकी शेतामधून घरी परत येत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेल्या



यवतमाळ, 15 जुलै: यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील माय-लेकी शेतामधून घरी परत येत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेल्या नाल्या शेजारी असलेल्या एका शेतात मुलीचा तर काही अंतरावर आईचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कविता किशोर राठोड व निमा किशोर राठोड अस मृत मायलेकीचं नाव आहे.


या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी दोन्ही मायलेकींचा शोध सुरू केला. दिग्रस तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागची चमू देखील तातडीनं घटनास्थळी पोहोचला. दोघींचा शोध घेतला असता नाल्याशेजारी असलेल्या एका शेतात मुलगी निमाचा तर काही अंतरावर तिची आई कविताचा मृतदेह आढळून आला.


या प्रकरणी दिग्रस पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मायलेकीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments