-->

Ads

विविध वर्गणीची माध्यमातून परप्रांतीय मौलाना करताहेत समाजाची लूट

विविध वर्गणीची माध्यमातून परप्रांतीय मौलाना करताहेत समाजाची लूटअंबरनाथमधील मोमीन युथ फाउंडेशनने दिले पोलीस प्रशासनाला पत्र


मूलतः बिहार येथील राहणारा शाहनवाज नावाचा परप्रांतीय मौलाना अंबरनाथमधील मुस्लिम समाजाची लूट 

विविध वर्गणीची माध्यमातून परप्रांतीय मौलाना करताहेत समाजाची लूट

अंबरनाथमधील मोमीन युथ फाउंडेशनने दिले पोलीस प्रशासनाला पत्र

 जामिया एज्युकेशनल ट्रस्टच्या अंतर्गत चालविण्यात येत असलेले मदरसे व इतर धार्मीक कार्यक्रमाकरीता वर्गणी गोळा करून व ती आपल्या वयक्तिक खर्च्यासाठी वापरून मूलतः बिहार येथील राहणारा शाहनवाज नावाचा परप्रांतीय मौलाना अंबरनाथमधील मुस्लिम समाजाची लूट करत असल्याचे व कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सर्व सण व उत्सवावर बंदी असतांना देखील हा बकरी ईद च्या कुर्बानीच्या नावावर सध्या ही सर्रासपणे वर्गणी उकळत असल्याची तक्रार येथील मोमीन युथ फाउंडेशनचे पदाधिकारी अकबर शेख, अहसामोद्दीन खान, एड. अजहर कुरेशी, नाजीम सय्यद आदींनी अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय धुमाळ यांच्याकडे एका लेखी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे, तसेच त्वरित त्याची वर्गणी उकळणे थांबवावे व त्याच्यावर उचित कारवाई करून आतापर्यंत गोळा केलेल्या रकमेची चौकशी करावी अशी मागणी ही फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे.






Post a Comment

0 Comments