-->

Ads

BREAKING: मुंबईतील मालाडमध्ये दुमजली घर कोसळलं, 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुंबईतील मालाडमध्ये अब्दुल हमीद मार्गावरील मालवणी परिसरात एक दुमजली घर कोसळलं आहे



मुंबई, 16 जुलै: मुंबईतील मालाडमध्ये अब्दुल हमीद मार्गावरील मालवणी परिसरात एका चाळीतील दुमजली घर कोसळलं. ही दुर्घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली दबून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 6 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.


अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, 1 रेस्क्यू व्हॅन आणि 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत 6 नागरिकांना बाहेर काढलं आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे मालाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments