-->

Ads

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या  सरकारविरोधात पुकारण्यात आलेल्या  आंदोलनात राजयभरातून ५० हजार शिक्षक सहभागी. 


 मुंबई : शासकीय कर्मचारी असलेल्या पेन्शनधारकांना जुनी  पेन्शन लागू करण्यात यावी यासाठी अनेक शिक्षक संघटना देखील यासाठी पाटीमबा दर्शवला होता . त्याच अनुषंगाने  विविध शिक्षक संघटना तसेच शिक्षकांना २ ओक्टोम्बर २०१८ रोजी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले होते आवाहन.  

 त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील सर्व भागातून शिक्षक बंधू आणि भगिनींनी  मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तब्ब्ल ५० हजार शिक्षक कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात पेन्शन दिंडीच्या माध्यमातून  सहभाग घेतला होता. 
महाराष्ट्रात या आंदोलनाचे पडसाद ठीक ठिकाणी पाहायला मिळाले. आंदोलकांनी आपला आवाज शासनापर्यंत पोहचवण्यासाठी  "एकच मिशन जुनी पेन्शन" नारे देत अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले  होते. 
                       याच पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील एका शिक्षक कर्मचाऱ्याने 'रन ऑफ पेन्शन' हि संकल्पना प्रत्यक्षात उतरवली  नाशिकचे प्राथमिक शिक्षक संतोष थोरात यांनी चक्क नाशिक ते मुंबईतील आझाद मैदान हा प्रवास धावत पूर्ण करून आंदोलनात सहभागी झाले. यादरम्यान रस्त्यात लागणाऱ्या सर्व शाळांना त्यांनी भेट देऊन आंदोलना चा उद्देश सगळ्यांपर्यंत पोहचवला . 

Post a Comment

0 Comments