-->

Ads

खबरदार! दारू प्याल तर पाच हजार दंड; बांसी ग्रामपंचायत चा ठराव

राजकुमार भगत : गावात कोणीही दारू ढोसली : किंवा दारू विक्री केली तर त्याला पाच हजारांचा दंड करण्यात येईल, असा एकमुखी ठराव पुसद तालुक्यातील बान्सी येथील गावकऱ्यांनी १३ सप्टेंबर रोजी ग्रामसभेत केला.सरपंच गजानन नामदेव टाले यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.


या ग्रामसभेमध्ये सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले. कोणताही वाद न करता एकमताने दारूबंदीचा ठराव पास करण्यात आला. त्यानुसार २१ सप्टेंबरपासून गावात दारूबंदी करण्यात आली आहे.


जो कोणी दारू काढेल किंवा दारू विकेल, त्याला पाच हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच त्याला ग्रामपंचायतच्या सर्व सुविधा बंद करून पोलिसात तक्रार देऊन रीतसर कार्यवाही करण्यात येईल, असे या ठरावात म्हटले आहे. या ग्रामसभेला उपसरपंच रेखा निरंजन राठोड, ग्रामपंचायत सदस्य संतोष शंकर आगलावे, अभय वसंतराव ढोणे, माधव उमाजी डोंगरे, शोभा राजेश आगलावे, सुनीता शेषराव लयाड, मंगल संदीप शर्मा, इंदूबाई शालीक तांबारे, सचिव पी. आर. आडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रमेश आगलावे, बान्सी आरोग्य केंद्राचे डॉ. गोरमाळी तसेच सर्व गावकरी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments