-->

Ads

बेलोरा येथे वानरांचा धुमाकूळ, अनेकांच्या घरावरील टिन पत्राचे केले नुकसान*महिला व लहान मुले यांच्यात भीतीचे वातावरण

 


राजकुमार भगत :पुसद तालुक्यातील बेलोरा या गावात अनेक दिवसापासून वानरांचा वावर सुरू आहे. गावातच जिल्हा परिषद शाळा श्री शिवाजी विद्यालय तसेच अंगणवाडी असल्यामुळे शाळा सुरू असताना  शाळेवरील टिनावर वानरे उड्या मारत आहेत. तसेच दुपारच्या वेळी शाळेतील,अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत असल्याने ते खाण्याच्या लालचे पोटी वानरे विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे विध्यार्थ्यां मध्ये भीती निर्माण झाली आहेत. जवळच बस स्टॉप परिसर असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात चारचाकी ,दुचाकी वाहनाची, वर्दळ असते वानरांच्या टोळके  रस्ता ओलांडताना एखाद्या वाहन धारकाला अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता  नाकारता येत नाही    तसेच वानरांचा संख्येत वाढ होऊन  दिवसेंदिवस  वानरांचे टोळके चे टोळके येऊन संपूर्ण गावात वानरांचा धुमाकूळ घालत अनेकांच्या घरावर उड्या मारून घरावरील टिन पत्रांचे नुकसान करीत आहेत.महिलांनी घराच्या छतावर, स्लॅब वर वाळत घातलेले धान्य खाऊन फस्त करत असून धान्यांची नासधूस करत आहेत .इतकेच नाही तर लहान मुले व महिलांच्या अंगावर धावून  जात आहेत. त्यामुळे लहान मुले आणि महिला यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. भविष्यात वानरांच्या हल्ल्यात जीवित हानी ची एखादी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने वेळीच लक्ष देऊन वानरांच्या टोळक्यांचा बंदोबस्त करण्यात यावा  अशी नागरिकांची व महिला वर्गातून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments