-->

Ads

उमरखेड येथे आरक्षणासाठी युवकाचे विष प्राशन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण मंडपात तरुणाने घेतले विष  


संजय जाधव :उमरखेड : मागील सात दिवसापासून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषण मंडपात आरक्षणाची मागणी घेऊन एका 35 वर्षीय युवकाने विष प्राशन केल्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे. तालुक्यातील गावोगावच्या  महिला ,पुरुष उपोषणासाठी बसलेल्या पाच मराठा तरुणांना पाठिंबा देण्यासाठी मागील सात दिवसापासून तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये हजेरी लावून पाठिंबा दर्शवीत आहेत .आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी तालुक्यातील काही गावकरी बांधव पाठिंबा देण्यासाठी आले असता त्यामधील एका 35 वर्षे तरुणाने उपोषण मंडपा समोर विष प्राशन करून सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली . उपोषण मंडपात दुपारी 1:00 वाजता अशोक देवराव जाधव वय 35 रा . जेवली  या तरुणाला वीष प्राशन करीत असताना उपोषण मंडपी बसलेल्या काही तरुणांनी थांबविण्याचा प्रयत्न केला व हातातील बॉटल काढून घेतली.  तात्काळ घटनास्थळी हजर असलेल्या रुग्णवाहिके मधून सदर युवकाला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.सदर रुग्णावर येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. या घटनेमुळे उपोषण मंडपात एकच खळबळ उडाली असून उमरखेडचे नाव पुन्हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्याच्या नकाशावर आले आहे.


Post a Comment

0 Comments