-->

Ads

पुण्यातील रस्त्यावरच्या खड्ड्यांना हार घालून श्रद्धांजली वाहतेय ‘ही’ व्यक्ती? पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ अमर देशमुख नावाच्या तरुणाने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला आहे. त्याने संतोष पंडित यांची भेट घेऊन त्यांच्या कामाबाबत माहिती दिली आहे.


पुण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत; ज्याकडे पुणे महापालिका दुर्लक्ष करीत असते. रस्त्यावरील खड्डे, उघडी असलेली गटारे, गटारांच्या झाकणांची दुरवस्था अशा अनेक समस्या नागारिकांना सातत्याने भेडसावत आहेत. या समस्या छोट्या असल्या तरी त्या धोकादायक ठरू शकतात. मात्र, प्रशासनाचे त्याकडे नेहमी दुर्लक्ष होत असते. पण, पुण्यात एक व्यक्ती अशी आहे की, जी पुणे महापालिका प्रशासनाला या समस्यांची दखल घेण्यास भाग पाडते. सध्या या व्यक्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध एका खड्ड्यासमोर उभी आहे आणि त्या खड्ड्यासमोर एक हार ठेवला आहे. रस्त्यावरील खड्ड्याला हार घालून त्या व्यक्तीने श्रद्धांजली वाहिली आहे.” ही व्यक्ती नक्की कोण आहे, असा प्रश्न पडला असेल ना? चला तर मग जाणून घेऊ.

हा व्हिडीओ अमर देशमुख नावाच्या तरुणाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला आहे. त्याने संतोष पंडित यांची भेट घेऊन, त्यांच्या कामाबाबत माहिती दिली आहे. संतोष पंडित असे या व्हिडीओतील व्यक्तीचे नाव आहे; जे पुणे महापालिकेला त्यांचे काम करण्यास भाग पाडतात आणि तेही गांधीगिरी शैलीमध्ये. पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे, उघडी असलेली गटारे, गटारांची दुरवस्था झालेली झाकणे आदी समस्यांकडे ते पालिका प्रशासनाचे लक्ष वेधतात. कधी खड्ड्याला हार घालून, कधी धोकादायक खड्ड्याभोवती रांगोळी काढून, तर कधी खड्ड्यासमोर पोस्टर हातात घेऊन ते थांबतात. त्यांनी त्यांच्या या कामांचे अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत.

अमरने त्यांना सद्यस्थितीवर मत काय विचारले असता त्यांनी पालिका प्रशासन, सत्ताधाऱ्यांवर रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ”काय बोलयचं नाही, बोलण्याच्या पलीकडे गेलेले आहे सगळं. कोण कोणाबरोबर सत्ता स्थापन करतेय याचा आपण तमाशा बघत राहायचा. औरंगजेबावर चर्चा झाली पाहिजे विधानभवनात, ते महत्त्वाचे विषय आहे या पायाभूत सुविधांशी काय घेण-देणे आहे. जनता मरतेय, मरू देत, पाच वर्षातून एकदा गरज असते नेत्यांना जनतेची. नेत्यांना बाकी वेळेस कशाला पाहिजे जनता. पाच वर्षात एकदा मतदानासाठी गरज पडते. बाकी वेळेस गेले उडत. लोकशाहीमध्ये जनतेची काहीच किंमत उरलेली नाही ही वस्तूस्थिती आहे.”


Post a Comment

0 Comments