-->

Ads

बनारसच्या ट्रॅफिकमध्ये अडकली एक्सप्रेस; वाट बघून ड्रायव्हरला आला राग अन्…VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

 


रस्त्यावर प्रचंड रहदारी असते त्यामुळे ट्राफिकची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. आज-काल कुठेच ट्राफिकची समस्या नवी नाही. घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला ट्राफिकला समोरं जावं लागतं. मात्र याआधी तुम्ही कधी एक्सप्रेस ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं ऐकलं आहे का ? नाही ना. मग हा बनारसमधला व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा, नक्की डोक्याला हात माराल.

वाहतूक नियमांची पायमल्ली

रस्त्यावर प्रचंड रहदारी असते त्यामुळे ट्राफिकची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. आज-काल कुठेच ट्राफिकची समस्या नवी नाही. घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला ट्राफिकला समोरं जावं लागतं. मात्र याआधी तुम्ही कधी एक्सप्रेस ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं ऐकलं आहे का ? नाही ना. मग हा बनारसमधला व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा, नक्की डोक्याला हात माराल. देशात रस्ते अपघात सातत्याने होत आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. जनजागृतीसाठी जनजागृती मोहीमही राबवली जाते. विविध ठिकाणी स्वत: अधिकारी देखील या प्रचाराकरिता रस्त्यावर उतरलेले आपण पाहिले आहेत. पण असे असूनही लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्याचबरोबर काही लोक नकळत वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, तर काहीजण जाणीवपूर्वक नियमांची पायमल्ली करतात.

एक्सप्रेस अडकली ट्रॅफिकमध्ये

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अनेक ठिकाणी आजही रेल्वे मार्गावरुन जाणारे रस्ते आहेत. अशा ठिकाणी फाटक लावून ट्रेन येताना वाहतूक थांबवली जाते. ट्रेन गेल्यानंतर पुन्हा या मार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांची म्हणजेच रस्ते वाहतूक पूर्वव्रत केली जाते. मात्र उत्तर प्रदेशमधील बनारस येथे रेल्वे फाटकावर चक्क एक एक्सप्रेस ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओच्या उजव्या बाजूला एक ट्रेन थांबलेली दिसत आहे. तर डाव्याबाजूला वाहतूक कोंडी दिसून येत आहे. या ट्रेनच्या समोरुन वाहने ये जा करत असून ट्रेनचा मोटरमन मात्र हॉर्न वाजत आहे. ट्रेनच्या हॉर्नचा आवाज व्हिडीओत स्पष्टपणे येत आहे. ज्या गाडीमधून व्हिडीओ काढण्यात आला आहे तिच्या समोरच उभं राहून एक पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रॅफिक क्लिअर करुन ट्रेनला मार्ग मोकळा करुन देण्याचा प्रयत्न पोलीस करताना दिसत आहेत. मात्र ट्रेनच्या ट्रॅकवरुन जाणाऱ्या गाड्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. या दरम्यान एक्सप्रेसमधला चालक रागाने हॉर्नही मारत आहे.

Post a Comment

0 Comments