-->

Ads

सालाबादप्रमाणे यंदाही मोठया उत्साहात सिंधी बांधवांचा चालीहो समाप्ती झाली.

 प्रतिनिधी:रेखा भेगडे; पिंपरी चिंचवड :सालाबादप्रमाणे यंदाही सिंधी बांधवांनी मोठ्या आनंदाने चालिहो समाप्ती च्या पूर्वसंध्येला पिंपरी येथील  सिंधी समाजातील बांधवांनी बाजारातुन संत झुलेलाल, संत बाबा छतुंराम, याच्या पतिमेचया सह विविध प्रकारच्या देवदेवतांचे वेश धारण करून शोभायात्रेत यात्रा काढली होती 

सिंधी समाज बांधव चाळीस दिवस उपवास करून पुजा,भजन,किर्तन,संतसंग,अशा प्रकारे चालिहो साजरा करतात आणि विषेश म्हणजे या दिवसांत समाजासमाजात बंधूता निर्माण होण्यासाठी संदेश देत असतात 


आज दिनांक 24/ 8 / 23 वार गुरूवार रोजी सदर शोभायात्रेत सिंधी समाजातील विविध सामाजिक संघटना आणि संस्था शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते सिंधी समाजातील महिला, पुरूष, मुले, मुली संत झुलेलाल यांच्या भजनांवर ठेका धरुन नाचत नाचत चालिहो ची सांगता करताना आनंद व्यक्त करताना दिसत होते 


पिंपरी येथील सेंट्रल पंचायत, आंतरराष्ट्रीय सिंधी समाज सेवा संघटन या संस्थेचे पदाधिकारी गोपी आसवांनी, मनोहर जेठवानी, किरण रामनानी,कंचन रामनानी,शिवनदास पमनानी, इंदर बजाज, सुशील बजाज, राजेश चांदवानी, अनिता पुरी, खुशीराम तलरेजा, मनोज पंजाबी, हेमंत राजेश, सुरेंद्र मंघनानी,श्रीचंद नागराणी आदी सहभागी झाले होते.



Post a Comment

0 Comments