-->

Ads

ध्वजारोहणानंतर पोहायला गेले, तीन तासांनी वाईट बातमी आली, दोन अल्पवयीन मुलं बुडाली

 ध्वजारोहण करुन घरी आले. मग, बंधाऱ्यात पोहायला गेले. मात्र, तीन तासांनी वाईट बातमी आली. साताऱ्यात दोन अल्पवयीन मुलं बुडाली


सातारा: १५ ऑगस्टला ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सुट्टी असल्याने बोगदा परिसरातील जानकर कॉलनीच्या परिसरात असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांवर काळाने घाला घातला. या दोन मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. स्वप्नील सुनील मोरे (वय १५) आणि अमोल शंकर जांगळे (वय १६, दोघेही रा. जानकर कॉलनी, बोगदा परिसर, सातारा) अशी या दुर्दैवी मुलांची नावे आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर घरी आलेल्या स्वप्नील मोरे आणि अमोल जांगळे यांना पोहण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे दोघेही जानकर कॉलनी परिसरात असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यास गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास दोघेही पोहण्यास निघून गेले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते बुडाल्याचे समोर आल्यानंतर परिसरात खळबळ माजली. या घटनेमुळे मोरे आणि जांगळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर याबाबत सातारा तालुका पोलिसांना कळवण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मेणकर, बीट अंमलदार चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बंधारा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सच्या सदस्यांना बोलावण्यात आल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments